raj thakray | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मनसेचे "पताका आंदोलन"

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : भावे नाट्यगृहासाठी मनसेने आज शहर अभियंत्याकडे "पताका आंदोलन" केले. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे संदीप गलगुडे, नीलेश बाणखेले, श्रीकांत माने यांच्या नेतृत्वाखाली मनपा शहर अभियंता मोहन डगावकार यांच्या दलनामध्ये भावे नाट्यगृहाबाबतची निवेदने व बातम्या असलेले तोरण बांधून पताका आंदोलन केले. या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शहर अभियंता मोहन डगावकार यांचे दालन 'जागे व्हा जागे व्हा शहर अभियंता जागे व्हा.' ' अशा प्रशासनाने करायचे काय खालती डोके वरती पाय'. भावे नाट्यगृहाचे काम सुरु करा , सुरु करा. या घोषणांनी नवी मुंबई महापालिका दणाणून सोडली. 

गेल्या शनिवारी' षडयंत्र' या नाटकाचा शुभारंभ प्रयोग सुरू होण्याअगोदर स्लॅबमधून निघून टेलीक्‍लाइंबर मशिन स्टेजवर पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही भावे नाट्यगृहाची दुरवस्था तत्काळ मार्गी लावा, अशी मागणी मनसेने केली होती. 

दोन दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले.इलेक्‍ट्रिकच्या वायर बाहेर लोंबकळत असणे, अनेक ठिकाणी उघड्या DP, अद्ययावत इलेक्‍ट्रिकचे साहित्य न लावणे, पंख्यांची दुर्दशा, AC प्लांट नादुरुस्त अवस्थेत, साऊंड सिस्टिम नादुरुस्त, अनेक ठिकाणी / व्हॅट चे हॅलोजन किंवा लाइट वापरलेल्या आहेत त्याच बरोबर अनेक ठिकाणी भिंतींना पापुद्रे जाणे, मेकअप रूममधल्या वॉशरूम्सची दुरवस्था, तालीम रूमची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्या असल्याचे छायाचित्रणासाहित शहर अभियंत्यांना मनसेने याप्रसंगी लक्षात आणून दिले. 

"मनपा शहर अभियंता मोहन डगावकार यांनी भावे नाट्यगृहाची दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करू असे लेखी पत्र मनसेच्या शिष्टमंडळाला दिले व मनसे सोबत गुरुवारी पाहणी दौरा करण्याचे मान्य केले. 

संबंधित लेख