Raj Thakare to reach people on Facebook | Sarkarnama

राज ठाकरे  गुरुवारपासून फेसबुकवर !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून (ता. 21) फेसबुकवर भेटणार आहेत. घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे फेसबुकवरून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

राज यांच्या फेसबुक एन्ट्रीचा टीझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून लॉंच करण्यात आला आहे. "व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन्‌ दांभिकतेवर गरजणारी "राज'गर्जना आता फेसबुकवर' असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे राज यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे फेसबुकवरून कुणाकुणावर वार करतात, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गुरुवारी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात होणाऱ्या खास कार्यक्रमात राज यांच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात येईल. यामुळे सोशल मीडियातून राज तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत.

संबंधित लेख