raj thakare in pune | Sarkarnama

जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर आरक्षण हवे - राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : आरक्षण हे जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर असायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर माझी भूमिका तुम्हाला ऐकायची आहे असे सांगून ते म्हणाले मी या विषयावर यापूर्वीही बोललो आहे, पुन्हा एकदा सांगतो काकासाहेब शिंदे या तरुणाने आपला जीव हकनाक गमावला आहे. माझ्या मते आरक्षण हे आर्थिक निकषावरच हवे असे त्यांनी सांगितले. आताचे सरकार असो किंवा यापूर्वीचे सरकार असो ते लोकांच्या भावनेशी खेळतच आहे असाही त्यांनी आरोप केला. 

तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले तुम्ही नीट परिस्थिती समजावून घ्या मुळात नोकऱ्यामध्ये दिलेले आरक्षण उपयोगी पडणार नाही, कारण आता सरकारी नोकऱ्या दिवसेदिवस कमी होत जाणार आहेत आणि जास्तीत जास्त नोकऱ्या खासगी क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत, होत आहेत, या नोकऱ्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांना जर राखीव ठेवल्या तर कुणालाच आरक्षणाची गरज भासणार नाही. आपल्या नोकऱ्या परप्रांतीय बळकावत आहेत असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कालवले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. 

दिवंगत माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंग यांची सर्वात घाणेरडा पंतप्रधान अशी संभावना करून ते म्हणाले, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशात जातीयतेचे विष कालवले गेले आहे. देशात सध्या केवळ मतासाठी राजकारण चालू असल्याचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, पंतप्रधान कुठल्या एका राज्याचा असता कामा नये. त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, तुम्ही सावध राहा, राजकारणी केवळ तुमचा वापर करत आहेत त्यांच्यापासून अगदी सावध रहा. 

संबंधित लेख