raj thackrya and pimpri mayor | Sarkarnama

नम्रपणा शिकविणाऱ्या संस्कृतीमुळे राज यांच्या पाया पडलो ः महापौर राहूल जाधव 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पिंपरी ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे मी राजकारणात आलो. संधी मिळाली. यशस्वी झालो. त्यामुळे ते शहरात आले असता त्यांच्या पाया पडलो. यात चूक केली असे वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. आपली संस्कृती नम्रपणा शिकवीत असल्यानेच मी त्यांच्या पाया पडलो, असे म्हणत त्यांनी यावरून उदभवलेल्या वादावर आपल्या बाजूने पडदा टाकला. 

10 ऑगस्टला ठाकरे हे एका जीमच्या उदघाटनाला उद्योगनगरीत आले होते. त्यावेळी महापौर त्यांच्या पाया पडले होते. त्यावरून ओबीसींचे मसिहा आणि मंडल लागू करणारे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंह यांना टीकेचे लक्ष्य करणारे ठाकरे यांना ओबीसी महापौरांनी वंदन केल्याने त्यांना टार्गेट करण्यात आले होते.

त्यावर महापौरांचा बचाव ओबीसी संघर्ष कृती समितीने केला होता. या वादंगावर महापौरांशी संपर्क केला असता त्यांनी आपली भुमिका निर्भीडपणे मांडली. उलट आपल्या या कृतीची अनेकांनी फोन करून वाहवा केली, आपले अभिनंदनच केले, असे ते म्हणाले. 

महापौरांनी आपली ही भुमिका समतोलपणे मांडली. राजकारणातले पहिले गुरु (राज ठाकरे) यांच्याप्रती आदर कायम राखताना नंतरचे दुसरे गुरु (भोसरीचे अपक्ष आमदार महेशदाद लांडगे) हे सुद्धा दुखावले न जाण्याची त्यांची काळजी घेतली. ते म्हणाले, मी नेहमीच चांगले निर्णय घेत असतो. मनाला जे वाटते तेच करतो. भले मग मी रसातळाला जाईल. माझा मी आहे.

माझ्यामागे कोणी नाही. महेशदादा माझे राजकीय दैवत आहेत. राजकीय निर्णय त्यांच्या परवानगीने घेतो. पण, पाया पडण्यासारखे निर्णय मलाच घ्यायचे असतात. त्यावेळी दादांना फोन करून विचारायचे होते का, दादा आता माझ्यापुढे राज ठाकरे आहेत. त्यांच्या पाया पडू का ? त्यांनी सुद्धा माझा हा निर्णय चांगला असल्याचे नंतर सांगितले. त्यांच्यामुळे (राज ठाकरे) म्ह्‌ुी राजकारणात आहात, असेही दादा म्हणाले. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता, हे शाबीत झाले. त्यामुळे या वादावर मी आता पडदा टाकला आहे. 
 
संबंधित लेख