raj thackrey wears a cap | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अखेर राज ठाकरे यांनी टोपी घातलीच!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्याचा दौरा झाल्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघातील ओतूर या गावी गेले होते. या मतदारसंघात शरद सोनवणे हे मनसेचे आमदार आहेत. राज यांची क्रेझ पुन्हा वाढत असल्याचे या दौऱ्यातून दिसून येत आहे.

मनसेचे आमदार असूनही गेल्या पावणे चार वर्षांत सोनवणे यांनी एकदाही राज यांना आपल्या मतदारसंघात भेटीसाठी बोलवले नव्हते. अखेर राज आले. त्यांनी ओतूर येथील कुस्ती आखाडा मैदानाचे उद्घाटनही केले. पुणे जिल्ह्यात मनसेची राजकीय ताकद फार नाही. मात्र राज यांच्याविषयी तरुणांमध्ये जोरदार आकर्षण आहे. त्याचाच प्रत्यय राज यांनाही आला.

त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दी होती. मंचरजवळ त्यांच्या स्वागतासाठी शेकडो तरूण जमले होते. राज यांचे स्वागत या तरुणांनी वेगळ्या पद्धतीने केले. उत्तर पुणे जिल्ह्यात विशेष प्रकारची टोपी वापरली जाते. ही गांधीटोपी असली तरी तिचा पुढील भाग टोकदार आणि कडक असतो. त्यामुळे या टोपीचा वेगळाच असा बाज असतो. राज यांच्या स्वागतासाठी जमलेल्या तरुणांनी ही टोपी डोक्यावर परिधान करण्याचा आग्रह धरला. राज यांनी तो मान्य करताच ती टोपी डोक्यावर घातली. त्यानंतर तरुणांनी जोरदार घोषणा दिल्या.

राज ठाकरे हे फटकून वागण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांनीही आपली स्टाइल बदलल्याचे संकेत या कृतीतून दिले. (सोबत पाहा व्हिडीओ) 

संबंधित लेख