raj thackrey take forward lagacy of balasaheb : avhad | Sarkarnama

`बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे चालवत आहेत' 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मुंबई : चाळीस वर्षांपूर्वी शिवसेनेने एकही जागा न लढविता कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तोच वारसा राज ठाकरेही चालवत आहेत. मग त्यांच्या नावाने शिमगा का करता, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला केला आहे. आव्हाड यांनी ट्‌विटद्वारे आपली भूमिका मांडली.

1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला समर्थनदेखील दिले होते. त्यांचाच कित्ता गिरवत आज राज हेदेखील एकही जागा लढवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांसाठी ही खास माहिती, असे ट्‌विट करीत त्या वेळच्या "मार्मिक'मध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्‌विटमध्ये वापरले आहे. 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या नांदेड येथे पहिली सभा पार पडल्यानंतर सोलापूरला दुसरी सभा होईल. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी राज्यभरात प्रचार करणार नसल्याचे त्यांनी पाडव्याच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. यानुसार पहिल्या टप्प्यात राज ठाकरे यांच्या सहा सभा होणार असून, आवश्‍यकतेनुसार सभांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता मनसे नेते व्यक्‍त करीत आहेत. 
 
संबंधित लेख