raj thackrey invites bandal at krishkunj | Sarkarnama

मंगलदास बांदलांना निमंत्रण थेट `कृष्णकुंज`चे

भरत पचंगे
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

शिक्रापूर : `तुम्ही कृष्णकुंजवर याच! भारी वाटलं तुमचं भाषण आणि संवादकौशल्य पण. आमच्या रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा,` असं खुद्द राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दिले.

शिक्रापूर : `तुम्ही कृष्णकुंजवर याच! भारी वाटलं तुमचं भाषण आणि संवादकौशल्य पण. आमच्या रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा,` असं खुद्द राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दिले.

ओतूर (ता.जुन्नर) येथे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्या एका कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापुढे ’तुम्ही फक्त हो म्हणा, शिरुरचा खासदारही तुमचाच होईल..’ असे म्हणून स्वत:च्या लोकसभा उमेदवारीची मागणी राज यांच्याकडे केली.

बांदलांच्या भाषणाने मनसेचे स्टार आमदार दिवंगत रमेश वांजळे यांची आठवण नक्कीच राज ठाकरेंना झाली. राज ठाकरे हे भाषणासाठी बोलायला जाण्याआधी व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी बांदलांना जवळ बोलाविले. बांदल काहीतरी यांच्या कानात  कुजबुजले. यात त्यांनी थेट घरी येण्याचे निमंत्रण दिल्याचे बांदल यांनी `सरकारनामा`ला सांगितले. 

शिरूर लोकसभा मतदार घातील शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना गेल्या तीन निवडणुकांत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने जंग-जंग पछाडले. पण त्यात अपयश आले. उलट त्यांच्याविरोधात आता कुठल्याच पक्षात कुणीच उमेदवार इच्छुक नसल्याची स्थिती सध्यातरी आहे.

माजी सभापती मंगलदास बांदलांचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य, भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी (सन २००९), पुन्हा राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापतीपद आणि पुन्हा राष्ट्रवादीकडून हकालपट्टी असा प्रवास केला आहे. तरीही गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पत्नी रेखा  यांना अपक्ष म्हणून विक्रमी मतांनी जिल्हा परिषदेत पाठविले.

योग्य वेळी योग्य चाली खेळत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यात त्यांनी आतापर्यंत यश मिळवले आहे. सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवत आपला प्रभाव दाखवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

लवरकच बांदल `कृष्णकुंज`वर जातीलही. मात्र बांदलांचा एकूण स्वभाव पाहता ते कुणाला डोळा मारुन कुणाकडून उमेदवारी मिळवतील, याची शाश्वती खुद्द ते सुद्धा देऊ शकत नाहीत.

वाचा आधीची बातमी- शिरूर लोकसभेला मनसेकडून मंगलदास बांदल? 

संबंधित लेख