raj thackray press nashik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

सध्याचे देशातील वातावरण घाण, राज ठाकरेंची मोदी सरकारवर टीका 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नाशिक : अभिनेये नसरुद्दीन शहा काय म्हणाले ते मला माहीत नाही. त्या विषयी त्यांनाच विचारा मात्र सध्याचे चर्चेचे विषय पहिले तर देशातील वातावरण घाण झाले आहे हे नक्की अशी सडकून टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केली. 

लोकांच्या मोबाईल, संगणक तपासण्याचा अधिकार तपास संस्थांना दिलाय. यामध्ये जसजसे ते लोकांच्या संगणकात डोकावून पाहतील तस तसे लोक नरेंद्र मोदींविषयी किती संतप्त आहेत हे त्यांना दिसेल. जसजशा निवडणुका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल असेही ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या आज समारोप झाला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "" आज देशात सत्तेत असलेले लोक हनुमान चिनी होता असे म्हणतात. गोहत्येवर जमावाकडून हत्या घडतात. राम मंदिराच्या विषयाची चर्चा होते. पाच वर्षे हे लोक राज्यात अन्‌ देशात सत्तेत होते. ते अशा विषयावंर चर्चा घडवत असतील तर हा मुलभुत विषयांवरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. हे लोकांना चांगले कळते. मी स्वतः गुढीपाडव्याच्या सभेत, निवडणुका जवळ येतील तसे हे लोक राममंदिराचा विषय काढतील. त्यावरुन दंगली घडवतील हे बोललो होतो. आज प्रत्यक्षात तसेच घडतांना दिसते.'' 

सरकारने दहा तपास संस्थांना लोकांचे संगणक, मोबाईल्सचा डाटा तपासण्याचा अधिकार दिला आहे. याविषयी राज ठाकरे यांनी नापसंती व्यक्त केली.

हे लोक लोकांच्या घरांतील संगणकात डोकावुन पाहतील तितके लोक सरकार विरोधात बोलत राहतील. पाच राज्यांतील निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयीचा राग व्यक्त झाला आहे. विरोधी पक्ष जिंकत नसतो. निवडणुकांत सत्ताधारी हरतात. त्यानंतर कोणती व्यक्ती सत्तेत येईल हे लोक नव्हे तर निवडुण आलेला पक्ष ठरवतो. भविष्यात मोदींना पर्याय कोण हे दिसेल असेही राज ठाकरे म्हणाले. 

संबंधित लेख