raj thackray maruti bhapkar news | Sarkarnama

ओबीसी व बारा बलुतेदार संघटनेचे स्वयंघोषित नेते प्रताप गुरव लुच्चे ः मारूती भापकर 

उत्तम कुटे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पिंपरी ः पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाया पडण्यावरून उठलेल्या गदारोळावर महापौरांनी आपल्यापरीने पडदा टाकून हा वाद शमविण्याचा प्रयत्न करूनही तो अद्याप निमालेला नाही.

आता या वादाला तोंड फोडणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आपल्यावर टीका करणारे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष गुरव यांच्यावर आज कठोर शब्दांत हल्लाबोल केला. गुरव हे या संघटनेचे तथाकथित व स्वयंघोषित लुच्चे पुढारी असल्याचा पलटवार त्यांनी केला. 

राज ठाकरे हे गेल्या शुक्रवारी (ता.10) पिंपरीत आले होते. त्यावेळी मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्यावर जहरी टिका करणारे ठाकरेंच्या पायी महात्मा फुलेंच्या वेषात महापौर निवडीच्या वेळी आलेले ओबीसी महापौर लीन झाले होते. यावर बाराबलुतेदार व ओबीसी महासंघ काय भूमिका घेतो असे पाहू, असे वक्तव्य भापकर यांनी केले होते.

त्यावर गुरव यांनी सडकून टीका केली होती. त्याचा समाचार भापकर यांनी आज घेतला. त्यातून ठाकरे व महापौर राहिले बाजूला व या दोघांतीलच संघर्ष टोकाला गेल्याचे दिसून आले आहे. 

मी ओबीसी समाजाविरुद्ध अजिबात नाही,असे स्पष्ट करताना भापकर म्हणाले, माझा विरोध हा ज्यांनी मंडल आयोगाचा लाभ घेवून आर्थिक उन्नती करून घेतली त्या गुरव यांना आहे. राज ठाकरे यांनी व्ही. पी. सिंहावर जहरी टीका केली, तेव्हा कुठे हे उंदरासारखे दडून बसले होते. अरे केवढा हा त्यांचा कृतघ्नपणा. यांना जणांची नाही, मनाची तरी लाज वाटली पाहिजे.

हा लबाड कोल्हा समाजवादाचा बुरखा पांघरून बाराबलुतेदाराचा नेता झालेला आहे. समाजाचा वापर करून कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात महामंडळावर वर्णी लागावी म्हणून बाराबलुतेदार बांधवांचा मेळावा लावून कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याला शहरात बोलाविले पण डाळ शिजली नाही. महापालिकेत सत्ता बदल झाला भाजपची सत्ता आली. महापौर निवडणुकीत यांनी पुढेमागे स्वःता:साठी पदावर डोळा ठेवून भाजपाच्या पालखीचे भोई होवून खांदेकरी होण्याचा प्रयत्न केला. 

गुरव व विशाल जाधव हे उपकाराची जाण ठेवून व्ही पी सिंहाप्रती कृतज्ञता व्यक्त करून राज ठाकरेंचा निषेध करतील व महापौरांना जाब विचारतील असे मला वाटल होते. मात्र, तसे त्यांनी केले नाही.

गुरव, जाधव यांनी मुळ विषयाला बगल देत त्यांनी माझ्याबाबत चावून चावून चोथा झालेले विषय पुढे आणून भाजपा कडून सुपारी घेवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. गेली काही वर्षे जनचळवळीत काम करीत असताना मी सुरवात कशी केली नगरसेवक म्हणून काय काम केले हे सर्व शहरवासीयांना माहीत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख