raj thackray attack modi in solapur | Sarkarnama

शहीद जवानांच्या नावाने मतं मागणारा मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : जवानांच्या नावाने मते कसली मागता ? शहीद जवानांच्या नावाने मते मागणारा असा पंतप्रधान आजपर्यंत मी पाहिला नाही असा संतप्त सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापुरात केला. 

आमच्या जवानांच्याबद्दल पंतप्रधानच्या मनात काय आहे ते कळून येते. आताच्या घडलेल्या घटनाबाबत ते मते मागतात कसे काय ? असे सांगून ते म्हणाले, की जवानांच्या नावाने मते मागण्यासाठी पुलवामा घडविले का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

मोदी-शहा ही जोडी राजकीय क्षितीजावरून नाहीसे झाले पाहिजेत. या जोडीला कोणत्याही परिस्थिती घालवा असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. राज यांच्या सभेला सोलापुरकरात जनसागर लोटला होता. नेहमीप्रमाणे त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढविला.

ते म्हणाले, "" मी मोदी-शहांविरोधात सभा घेत आहे. या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपची मंडळी अस्वस्थ झाली आहेत. माझ्या सभेचा खर्च मागता आहे. पण, मला कळत नाही की या खर्चाचा संबंध काय ? मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर स्टार्टअप, मेक इंडिया, स्वच्छ भारत सारख्या योजना राबविल्या. या योजनांसाठी चार हजार कोटींवरून अधिक खर्च झाला त्याचा हिशोब मात्र कोणी मागत नाही.'' 

मेक इंडियात काम मिळविण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जाते असा गंभीर आरोप करून राज म्हणाले, की नगरमधील एका तरूणाला मेक इंडियाचे काम मिळविण्यासाठी पैसे चारायला लागले. कंटाळलेला हा तरूण आत्महत्या करायला निघाला होता. पण, त्यांने माझे भाषण ऐकून त्याने बाळा नांदगावकरांना फोन केला आणि मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांने कथन केलेली माहीती धक्कादायक होते. या योजनेत काम मिळविण्यासाठी पैसे मोजावे कसे काय लागतात. काय झाले त्या स्टार्टअप इंडिया असा सवालही त्यांनी केला. 

पुलवामा हल्ल्यानंतर ज्या जवानांनी देशासाठी त्याग केला त्या जवानांच्या नावाने मोदी मते मागतात हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले. 
 
संबंधित लेख