raj thackray appeal to maratha samaj | Sarkarnama

झेपत नसेल तर सरळ पायउतार व्हा ! राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई : "" वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये असा रोखठोक इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फडणवीस सरकारला दिला. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज यांनी मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला असून मराठ्यांना न्याय मिळाला अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रसिद्धीस निवेदन दिले आहे 

या निवेदनात राज म्हणतात,"" मराठा मूक-क्रांती मोर्चाचं ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केलं होतं. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असंही म्हटलं होतं. काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही. 

एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले असा आरोपही त्यांनी केला. 

सरकारला इशारा देताना ते म्हणाले, की सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे ? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत ? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का ? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्‍या अडचणी काय ? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय ? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. 

नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असं की सरकारला "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख