raj reaches in vidharbha | Sarkarnama

राज यांचे रेल्वे इंजिन विदर्भात पोचले : दोन आमदारांचे डबे जोडले जाणार

सुरेंद्र चापोरकर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

अमरावती : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पश्‍चिम विदर्भातील शिवसेनेच्या वर्चस्वाला छेद देण्याची संपूर्ण तयारी केली आहे. तब्बल पाच दिवस विदर्भातील किमान दोन आमदार मनसेला मिळू शकतात.

राज ठाकरे यांचे आज अमरावतीत रेल्वेने आगमन झाले. यावेळी रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांचा हा पहिला अमरावती दौरा असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह होता.

अमरावती : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पश्‍चिम विदर्भातील शिवसेनेच्या वर्चस्वाला छेद देण्याची संपूर्ण तयारी केली आहे. तब्बल पाच दिवस विदर्भातील किमान दोन आमदार मनसेला मिळू शकतात.

राज ठाकरे यांचे आज अमरावतीत रेल्वेने आगमन झाले. यावेळी रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांचा हा पहिला अमरावती दौरा असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह होता.

ठाकरे यांचे पाच दिवस भरगच्च कार्यक्रम असून ते मेळघाटमध्ये थांबणार आहेत. अचलपूर (जि. अमरावती) येथे ते दसरा साजरा करणार आहेत. अमरावती येथे आयोजित अंबा महोत्सवाला ते हजेरी लावणार आहेत. यावेळी ते पूर्व व पश्चिम विदर्भात मनसेचे जाळे घट्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेत मनसेतर्फे काही मतदारसंघांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. यात पश्चिम विदर्भातील वणी (जि. यवतमाळ) व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या दोन विधानसभा मतदारसंघात मनसेचे खाते विदर्भात उघडू शकते. यामुळे या दौऱ्यात ते वणीलाही भेट देणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत वणी व हिंगणघाट या दोन मतदारसंघात मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यामुळे विदर्भातील निवडकच मतदारसंघावर राज ठाकरे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. या मतदारसंघांची चाचपणी करण्यासाठी तसेच संभाव्य उमेदवारांना भेटण्यासाठी हा प्रामुख्याने दौरा राहणार आहे. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्याचा ते आढावा घेणार असले तरी विधानसभा निवडणुकीत फाईट देऊ शकतील, अशा उमेदवारांच्या ते शोधात आहेत. याची शोधाशोध या दौऱ्यात केली जाणार आहे.

पश्चिम विदर्भाचा दौरा आटोपल्यानंतर ते पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे. पूर्व विदर्भातील अनेक शिवसैनिक व इतर पक्षातील नाराज नेते मनसेमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे पूर्व विदर्भाचे मनसेचे संघटन प्रमुख हेमंत गडकरी यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अमरावती शहर कार्यकारिणी बरखास्त

राज ठाकरे यांनी अमरावतीत पाऊल टाकल्याबरोबर अमरावती शहर मनसे शहर कार्यकारिणी बरखास्त केली. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. याचवेळी शहर अध्यक्ष म्हणून पप्पू पाटील यांची नियुक्ती केली. शहर कार्यकारिणी काही दिवसांनी घोषित करण्यात येईल. सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून राज ठाकरे यांनी तात्काळ निर्णय घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. 

संबंधित लेख