raj interview on social media | Sarkarnama

बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला आवडले असते : राज ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे : मला शिवसेनाप्रमुक बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घ्यायला आवडले असते असे स्पष्ट करतानाच शाळेत मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. दहावीला मला केवळ 37 टक्के गुण होते अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली 

पुणे : मला शिवसेनाप्रमुक बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घ्यायला आवडले असते असे स्पष्ट करतानाच शाळेत मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. दहावीला मला केवळ 37 टक्के गुण होते अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली 

आजच्या बालदिनानिमित्त एबीपी माझाने राज ठाकरे यांना बालगोपाळांच्या उपस्थितीत बोलते केले. यावेळी मुलांनी राज यांना बालपणीचे अनेक प्रश्‍न विचारले. राज यांनीही शांतपणे या प्रश्‍नांना मनमोकळेपणांने उत्तरे दिली. दंगामस्ती, आवडते विषय, व्यंगचित्राकडे कसे वळलात, शिक्षकांचा कधी मार खालला का ? बाळासाहेबांचा सहवास ? पहिले भाषण आदी नाना प्रश्‍न त्यांना विचारले. 

शाळेत असताना तुम्हाला कोणते विषय आवडायचे यावर ते म्हणाले, की मला मराठी, चित्रकला अधिक त्यानंतर भुगोल, इतिहास आदी विषय आवडायचे. 

तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यावी असे कधी वाटले नाही ? बाळासाहेबांच्या इतक्‍या मुलाखती झाल्या ? जर बाळासाहेबांची मुलाखत घेतली असती तर त्यांना काय विचारले असते ? यावर राज ठाकरे म्हणाले, की पुण्यात एकदा बाळासाहेबांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार होते. त्यावेळी गाडगीळ यांनी मला असे विचारले कोणते प्रश्‍न विचारावे असे वाटते. त्यांनीही काही प्रश्‍न काढले होते. पण मी सांगितले, की व्यंगचित्रकार असतानाचा पोशाख, जोधपूर सूट आणि बाळासाहेब, झब्बालेंगा आणि बाळासाहेब पुढे भगवा पोशाख आणि बाळासाहेब. म्हणजेच वेषांतर. 

गाडगीळांनी बाळासाहेबांना हा प्रश्‍न विचारला खरा. पण, या प्रश्‍नांवर बाळासाहेब म्हणाले, की मी कपडे घालून फिरतो आहे ते काय कमी आहे का ? इतके उत्तर देऊन बाळासाहेब थांबले. 

मला मराठी, चित्रकला विषय शाळेत खूप आवडत असे. मी शाळेत असताना कशातही सहभागी होत नसे. घरात संगीताचे वातावरण होते. त्यामुळे संगीत मला खूप आवडायचे. माझे नावच मुळात स्वरराज होते ते पुढे राज झाले असेही ते म्हणाले.  

 
 

संबंधित लेख