raj babar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

योगी सरकारने साठ दिवसात  सहाशेवेळा इशारेच दिले 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

लखनौ : केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कृषीविरोधी धोरणांमुळे देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे धोरण कृषीविरोधी असल्याचा आरोपही कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. "यूपी'तील योगी सरकार हे केवळ "चेतावनी सरकार' असून, मागील साठ दिवसांच्या अवधीमध्ये या सरकारने केवळ सहाशेवेळा इशाराच दिला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला आणि उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी केला आहे. 

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी केवळ आभास असल्याचा आरोपही उभय नेत्यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारला पूर्ण झालेली तीन वर्षे आणि राज्यातील योगी सरकारच्या दोन महिन्यांच्या कामकाजाचा ताळेबंद या बैठकीत मांडण्यात आला. देशभरात 2015 मध्ये 35 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, या वर्षाच्या अखेरीस हे प्रमाण 12 हजार 602 वर पोचले होते. 2016 मध्ये मात्र या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली असून ते चौदा हजारांच्याही पुढे गेले. कृषिक्षेत्र दिवसेंदिवस अडचणीत येत असताना केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरले आहे, असे सुरजेवाला यांनी नमूद केले. 
 
संबंधित लेख