राज म्हणाले, तुम्हाला कोण आवडते उद्धव की राज ? पवारसाहेब म्हणाले, "" ठाकरे ''! 

 राज म्हणाले, तुम्हाला कोण आवडते उद्धव की राज ? पवारसाहेब म्हणाले, "" ठाकरे ''! 

 पुणे : "" पवारसाहेब, माझा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न विचारतो, की तुम्हाला अधिक कोण आवडते? उद्धव ठाकरे की राज ठाकरे ? त्यावर श्री. पवारसाहेबांनी दिलखुलास दाद तितक्‍याच चौकसपणे उत्तरही दिले ते म्हणजे,"" ठाकरे !'' 

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष यांनी या प्रकट मुलाखती श्री.पवार यांना बोलते केले. या मुलाखतीदरम्यान राज यांनी शेवटी एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारला उद्धव आणि राज पैकी कोण आवडते. जेव्हा राज यांनी हा प्रश्‍न केला तेंव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र पवारसाहेबांनी ठाकरे म्हणजेच उद्धव, राज यांच्यासह संपूर्ण ठाकरे घराणेच अधिक भावते असे अप्रत्यक्ष उत्तर दिले. राज यांच्या या प्रश्‍नाला आणि पवारसाहेबांच्या उत्तराला श्रोत्यांनी तितक्‍याच उत्स्फुर्तपणे दाद दिली. या प्रश्‍नांने ही मुलाखत संपली. शेवटी राज यांना एक व्यंगचित्र काढण्यासही सांगण्यात आले. राज यांनी ते काढले. ते व्यंगचित्र होते अर्थात शरद पवार यांचे !  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com