rail roko in sevagram | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसच्या लाटेने शेअर बाजारात सुनामी
राजस्थानात काँग्रेसच्या हातातून बहुमत निसटले
मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताच्या जवळ
भाजपनं छत्तीसगढ. राजस्थान गमावले
मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत
छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट

विदर्भवाद्यांचा रेल रोको यशस्वी 

सरकारनामा न्यूज ब्युरो 
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नागपूर ः विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी सेवाग्राम इथे यशस्वीरीत्या रेल रोको आंदोलन केले. यावेळी विदर्भातून जवळपास दीड ते दोन हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली. 

नागपूर ः विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी सेवाग्राम इथे यशस्वीरीत्या रेल रोको आंदोलन केले. यावेळी विदर्भातून जवळपास दीड ते दोन हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली. 

भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्‍वासन दिले होते. भाजपच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला तीन वर्षे झाली व राज्य सरकारचा अडीच वर्षांचा कालावधी संपला तरी विदर्भ राज्य निर्मितीच्या संदर्भात कोणतेही पावले उचलली जात नाही. या दोन्ही सरकारच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीने सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. यानुसार आज सकाळी 10 वाजेपासून सेवाग्राम रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते जमा झाले. पहिल्यांदा त्यांनी मालगाडी रोखली. त्यानंतर काही वेळाने चेन्नई-दिल्ली एक्‍स्प्रेस गाडी आली. या गाडीच्या समोर कार्यकर्ते उभे राहिल्याने गाडी सुटण्यास वेळ लागला. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. 

जवळपास अर्धा तास रेल्वे रोखल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पांगविले. या आंदोलनात माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, राम नेवले, नंदा पराते, नंदा नागुलवार, अरुण केदार आदींनी सहभाग घेतला. विदर्भातून जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते सेवाग्राम जमा झाल्याने रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. 

 

संबंधित लेख