on raigad police proltection | Sarkarnama

मराठा आंदोलनामुळे रायगडावर बंदोबस्त 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

महाड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याने सध्या रायगडावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

किल्ल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी किल्ल्यावर जाणारा पायी मार्गही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आल्याने शेकडो शिवप्रेमींना माघारी परतावे लागले. 

मराठा आरक्षणासाठी रायगडावर सोलापूरचे काही कार्यकर्ते 3 ऑगस्टला ठिय्या आंदोलन करणार होते, परंतु पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते परत गेले. शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने गडावर पर्यटकांची गर्दी वाढली होती. या दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील पायी मार्ग बंद करण्यात आला. 

परिणामी, शेकडो शिवप्रेमी, पर्यटक माघारी परतले. अनेकांनी निवास व भोजनाचे आरक्षण रद्द केले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले, असे हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. नंतर रोपवेवर आलेला ताण लक्षात घेऊन पोलिसांनी दुपारी 4 नंतर हा मार्ग खुला केला, परंतु शिवप्रेमींना त्यांची कडक तपासणी करून किल्ल्यावर सोडण्यास सुरुवात केली. 

पर्यटकांमध्ये नाराजी 
नातेखिंड येथे तपासणी नाके असून येथूनच शिवप्रेमींना परत पाठवले गेले असते, तर गडाच्या पायथ्याशी गर्दी झाली नसती. तसेच याबाबत प्रशासनाने कोणताही फलक लावलेला नव्हता, त्यामुळे अनेकांना त्रास झाला. या वेळी शिवप्रेमी संतप्त झाल्याने अखेर दुपारनंतर ओळखपत्र आणि वाहनांची तपातणी करूनच शिवप्रेमी व पर्यटकांना गडावर सोडले जाऊ लागले. 9 ऑगस्टपर्यंत गडावर हीच परिस्थिती राहणार असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख