raigad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथे 32 मण सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प तीन जून रोजी रात्री नऊ वाजता केला जाणार आहे.

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथे 32 मण सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प तीन जून रोजी रात्री नऊ वाजता केला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

श्री. भिडे म्हणाले,""छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर स्थापन केलेले 32 मण सोन्याचे सिंहासन मोगल आक्रमकांनी तोडून लुटून नेले. सर्व वास्तू, वस्तू आणि कागदपत्रे जाळून नष्ट केली. त्याला 329 वर्षे झाली.'' 
ते म्हणाले,""शत्रूचा विनाश करून स्फूर्ती देणारे सिंहासन शिवाजी महाराजांनी स्थापन केले. तसेच सिंहासन पुन्हा स्थापन झाले पाहिजे. राजकारण, नेतृत्व, सरकारचा आधार न घेता 1280 किलोचे सोन्याचे सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प तीन जून रोजी रात्री नऊपासून रायगडावर केला जाणार आहे. लाखो कार्यकर्ते उपस्थित राहतील. मदत करण्यासाठी बॅंकेचा खातेनंबर जाहीर केला जाईल. तिथेच रक्कम भरावी. सिंहासन पुनर्स्थापनेसाठी सरकारी मदत किंवा परवानगीची गरज नाही.'' 

संबंधित लेख