rahul says women not entry in rss | Sarkarnama

महिलांना संघाचे दरवाजे कायमचे बंद असतात, राहुल गांधी कडाडले 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे : "" ज्यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघात महिलांना प्रवेश दिला जाईल त्यादिवशी संघ राहणार नाही. संघात महिलांना दरवाजे कायमचे बंद असतात. कॉंग्रेस आणि त्यांच्या संस्कृतीत हाच फरक आहे असा कडाडून हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ-भाजपवर आज केला. 

पुणे : "" ज्यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघात महिलांना प्रवेश दिला जाईल त्यादिवशी संघ राहणार नाही. संघात महिलांना दरवाजे कायमचे बंद असतात. कॉंग्रेस आणि त्यांच्या संस्कृतीत हाच फरक आहे असा कडाडून हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ-भाजपवर आज केला. 

महिला कॉंग्रेसच्या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना राहुल गांधी संघ, भाजप आणि कॉंग्रेसच्या संस्कृतीत मोठा फरक असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसची जी विचारधारा त्याला तडा जावू दिला जाणार नाही असे सांगून राहुल म्हणाले, की कॉंग्रेसने नेहमीच पक्षात महिलांना स्थान दिले. यापुढे तर पुरूषांबरोबरच पक्षातही त्यांना स्थान देण्यात येईल. पुरूष पुढे आणि महिला मागे असे चित्र पक्षात तरी दिसणार नाही. याचाच एक भाग म्हणून यापुढे कॉंग्रेसने महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिला दीक्षित यांनी मुख्यमंत्री असताना दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. पक्षात आणखी अशा बऱ्याच मुख्यमंत्री होऊन गेल्या. त्यांनी चांगलेच काम केले आहे हे नाकारता येणार नाही. नेतृत्व करताना त्या कुठही कमी पडत नाही. कॉंग्रेसने महिलांचा नेहमीच पक्षात सन्मान केला. ही परंपरा अशीच पुढे सुरू राहिल. केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार गरीबांविरोधात आहे. गरीबांचे कल्याण या सरकारने केले नाही. शेतकरी, कष्टकरी, सामान्यांना जीएसटी, नोटाबंदीचा फटका बसला आहे. गरीबांवर मोदी सरकार आक्रमण करीत असल्याचा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

टॅग्स

संबंधित लेख