rahul london tour | Sarkarnama

राहुल यांचा लंडन दौरा होणारच 

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा लंडन दौरा रद्द झाल्याचे वृत्त अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने शनिवारी फेटाळून लावत राहुल यांचा हा दौरा नियोजनाप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले. 

अनिवासी भारतीयांपर्यंत पोचण्याचा कॉंग्रेसच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राहुल गांधी येत्या 22 ते 25 या काळात जर्मनी व लंडनला भेट देणार आहेत. 

कॉंग्रेस समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे, की राहुल गांधी यांचा लंडन दौरा रद्द झाल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. हे वृत्त असत्य असून राहुल यांचा लंडन दौरा नियोजनानुसार होणार आहे. राहुल गांधी हे लंडनमधील विद्वान, राजकीय नेते, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

संसद, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अशा अनेक संस्था व राजकीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. लंडनमधील भारतीय पत्रकार संघटनेशी राहुल संवाद साधणार आहेत. तसेच, "इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस'बरोबर येत्या 25 रोजी त्यांची नागरी सभा होणार आहे. पित्रोदा हे कॉंग्रेसशी दीर्घकाळ संबंधित आहेत. 

लंडनमधील दौऱ्यात राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा अनेक व्यक्तींनी व संस्थांनी व्यक्त केली आहे. राहुल यांनी लंडनमध्ये संपूर्ण आठवडा जरी वास्तव्य केले, तरी सर्वांशी संवाद साधणे शक्‍य होणार नाही, अशी स्थिती आहे.

 राहुल गांधी यांना कार्यक्रमांसाठी व संस्थांमध्ये भेट देण्याची विनंती करणारे अनेक दूरध्वनी गेल्या आठवड्यात आले होते. राहुल यांची भेट घेण्यास इच्छुकांचे आम्ही आभारी आहोत. मात्र दौऱ्याचा कालावधी कमी असल्याने सर्वांचे समाधान करणे शक्‍य होणार नाही, असे पित्रोदा यांनी नमूद केले आहे. 

संबंधित लेख