RAHUL KUL SNUBS RAMESH THORAT | Sarkarnama

माझ्यामुळे थोरात जिल्हा बॅंकेच्या पदावर : राहुल कुल यांचा टोमणा

अमरसिंह परदेशी
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पाटस : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी लबाड लांडगं म्हणून टीका केली होती. या टिकेवर फार न चिडत कुल यांनी उत्तर दिले. कुल हे आक्रमक उत्तर देतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी सध्या तरी थोरात यांच्याविरुद्धची शाब्दिक चकमक न वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. 

पाटस : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी लबाड लांडगं म्हणून टीका केली होती. या टिकेवर फार न चिडत कुल यांनी उत्तर दिले. कुल हे आक्रमक उत्तर देतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी सध्या तरी थोरात यांच्याविरुद्धची शाब्दिक चकमक न वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. 

कानगाव येथील कार्यक्रमात विरोधकांनी टीका करण्यापूर्वी विचार करून बोलावे, असा सल्ला आधी कुल यांनी दिला. पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून मी माघार घेतल्याने आपण बॅंकेच्या पदावर गेला आहात, हे लक्षात ठेवावे, असा टोला त्यांनी थोरात यांचे नाव न घेता लगावला. कुल यांनी लांडग्याची टीका फार मनावर न घेतल्याने या दोघांतील जुगलबंदी काही रंगली नाही.  विकासकामांवर चर्चा झाली पाहिजे. काही मंडळी विनाकारण जनतेची दिशाभूल करीत आहेत. आम्ही विकासकामांनी त्यांना उत्तर देऊ, असेही आव्हान त्यांनी दिले.

दौंड तालुक्‍यात आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम करीत आहोत. आजपर्यंत या माध्यमातून कोट्यवधींची मदत करण्यात आली आहे. कोणताही गरीब माणूस पैशांअभावी शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी मी घेत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

कानगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन कुल यांच्या हस्ते शनिवारी (ता. 8) पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. सरपंच संपत फडके, संजय दिवेकर, भानुदास शिंदे, ज्योती जाधव, राजेंद्र गवळी, नारायण गवळी, बापूराव कोऱ्हाळे, दत्तात्रेय मळेकर आदी या वेळी उपस्थित होते. 

अष्टविनायक रस्त्यांमुळे तालुक्‍यातील संबंधित गावांचे महत्त्व वाढणार आहे. रस्ते दर्जेदार होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सध्या खडकवासला कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, त्यामुळे अनेक शेतकरी पाण्यावाचून वंचित राहत आहेत. पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदीत जलपर्णी वाढली आहे. प्रशासनाने ती काढावी. किंबहुना त्यासाठी लागणारा खर्च शहर प्रशासनानेच करावा, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख