रासपचे आमदार राहुल कुल भाजपचे बूथ कार्यकर्ते

रासपचे आमदार राहुल कुल भाजपचे बूथ कार्यकर्ते

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार राहुल कुल भाजपचे बूथ कार्यकर्ता म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मोदी यांनी पुणे जिल्ह्यात रस्त्यांच्या विकासकामांसाठी दिलेल्या निधीबद्दल त्यांनी मोदी यांचे आभारही मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर, दौंडचे आमदार राहुल कुल, माळेगावमधील नेते चंद्रराव तावरे यांनीही यासाठी बारामतीतील मोरोपंत सभागृहात उपस्थिती लावली होती.

सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी भाजपचे उपरणे गळ्यात घातले होते. कुल यांनीही तो नियम पाळला. भाजपचा मंत्री असो की साधा कार्यकर्ता प्रत्येकाला एका बूथची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कुल हे देखील आता भाजपचे बूथ कार्यकर्ते झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते रासपच्या कपबशीवर निवडणूक लढविणार की भाजपच्या कमळावर एवढीच उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com