rahul kul and ramesh thorat ready to share dias | Sarkarnama

आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात १२०० कोटींच्या हिशोबासाठी आमनेसामने येणार का?

हितेंद्र गद्रे
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

यवत : दौंड तालुक्यात आपण केलेल्या विविध विकासकामांचा आकडा बाराशे कोटींवर गेला असल्याचा आमदार राहुल कुल यांच्या दावा आहे. तर माजी आमदार रमेश थोरात यांचा त्यावर अक्षेप आहे. त्यावर समोरासमोर बोलण्याचे कुल यांनी अनेकदा केलेले अवाहन रमेश थोरात यांनी एकदाचे स्वीकारले. त्यामुळे याबाबत जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यवत : दौंड तालुक्यात आपण केलेल्या विविध विकासकामांचा आकडा बाराशे कोटींवर गेला असल्याचा आमदार राहुल कुल यांच्या दावा आहे. तर माजी आमदार रमेश थोरात यांचा त्यावर अक्षेप आहे. त्यावर समोरासमोर बोलण्याचे कुल यांनी अनेकदा केलेले अवाहन रमेश थोरात यांनी एकदाचे स्वीकारले. त्यामुळे याबाबत जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील विकासकामांसाठी आणलेल्या निधीच्या आकड्यांवरून सुंदोपसुंदी सुरू असताना माजी आमदार रमेश थोरात यांना विद्यामान आमदार राहुल कुल यांनी समोरा समोर बसून चर्चा करण्याचे अनेकदा अवाहन केले. तुमच्या चारपट मी आणलेला निधी नसेल तर मी आगामी निवडणूक लढणार नाही. मात्र हे सत्य असेल तर तुंम्हीही लढू नका असे कुल यांचे आव्हन आहे. हे आव्हान भांडगाव येथील एका जाहीर कार्यक्रमात रमेश थोरात यांनी स्विकाल्याचे जाहीर केले होते.  तेंव्हापासून लोकांमध्ये हे खरेच समोरा समोर येणार का याची उत्सुकता आहे.

या दोघांना समोरासमोर येण्यासाठी दोघांशीही जवळीक असलेल्या वसंत साळुंखे या कार्यकर्त्यांने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी या दोन्ही आजी-माजी आमदारांना साळुंखे यांनी लेखी निवेदन देऊन एकत्र येण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. ही विनंती दोघांनीही मान्य केल्याचा साळुंखे यांचा दावा असला तरी तो नेमका दिवस व ठिकाण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान आमदार कुल यांनी आपल्या निधीचा लेखाजोखा जाहिर करून त्या बाबत स्वतःच्या वाढदिवसा (दि.30 आॅक्टोबर) दिवशी माहितीपत्रक प्रसिद्ध केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास येणाऱ्या तमाम नागरीकांना या पत्रकाचे वाटप करण्यात आले. आपला दावा खरा असल्याचे स्पष्ट करण्याचा कुल यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्यापुरता त्यांनी हा चेंडू थोरातांच्या कोर्टात ढकलला आहे. असे असले तरी साळुंखे यांच्या विनंती प्रमाणे या दोघांनी समोरासमोर यावे व जाणकारांच्या लवादासमोर आपले दावे स्पष्ट करावेत अशी तालुक्यातील मतदारांची अपेक्षा आहे. हे दोघे खरेच आमने-सामने येणार का याची जनतेला उत्सुकता आहे.

संबंधित लेख