श्रीगोंद्याच्या राजकारणात नवीन चेहऱ्याचे संकेत

श्रीगोंद्याच्या राजकारणात नवीन चेहऱ्याचे संकेत

नगर : पुत्र आमदार राहुल जगताप वाघाचा बछडा असून, विरोधकांनी गाफील राहू नये, असा सल्ला देत स्नुषा डॉ. प्रणोती जगताप याही राजकारणात रस घेत असल्याची डरकाळी कुकडीचा वाघ म्हणून प्रसिद्ध असलेले कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी फोडली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणात आगामी काळात नवीन चेहरा येण्याचे संकेत आहेत.

हा राजकीय बॉम्ब त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्यावर टाकल्याचे मानले जाते. तरुण वयापासून विद्यार्थी चळवळीपासून राजकारण सुरू करून कुकडी सरकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी झटणारा व सध्या आजारपणामुळे हतबल झालेल्या कुंडलिकराव जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंद्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणारे विधान केले आहे. राजकारणाच्या बुद्धिबळात कोण कोणते डाव टाकणार, ही सांगता येत नाही.

कुकडी कारखाना उभारताना, शैक्षणिक संकुल उभारताना जगताप यांना अनेक राजकीय विरोधाला सामोरा जावे लागले. स्थानिक विरोध मोडीत काढून त्यांनी राजकारण केले. जिल्हा परिषदेचे सदस्य असताना शेतकरी हिताची कामे केली. विधानसभा लढविण्याचे स्वप्न पाहिले, परंतु त्यात यश आले नाही. आता आजारपणामुळे राजकारण करणे शक्‍य नसले, तरी पुत्र राहुल जगताप यांनी आमदार होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा त्यांना अभिमान आहे. 

मुलगा आमदार राहुल जगताप हा वाघाचा बछडा आहे. तो अत्यंत सरळमार्गी आहे. लोकांच्या डोळ्यातील अश्रू त्याला पाहवत नाहीत. विरोधकांनी टाकलेल्या राजकीय डावाकडे तो विशेष लक्ष देत नाही. त्यामुळे आगामी काळात श्रीगोंद्याच्या भल्यासाठी तो अविरत प्रयत्न करणार आहे, असे कुंडलिकराव यांनी आपल्या मुलाचे कौतुक करीत श्रीगोंद्याच्या राजकारणातील आपला विजय झाल्याचे समाधान व्यक्त केले. 
डॉ. प्रणोती यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत 
आमदार राहुल जगताप यांचा नुकताच विवाह झाला. जगताप कुटुंबीयांत नव्याने सून म्हणून आलेल्या डॉ. प्रणोती या रेडिओलॉजीस्ट आहेत. एम.डी. असल्याने श्रीगोंद्यात लोकांच्या सेवेसाठी नवीन मोठे रुग्णालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. प्रणोती यांचे वडील राजेंद्र चव्हाण हे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. नंतर सांगलीत जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, पुण्यात महिला बालकल्याण आयुक्त आणि सध्या सिडकोचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आहेत. त्यामुळे डॉ.प्रणिता यांच्या घरात लहानपणापासूनच अधिकारी व राजकीय मंडळींचा राबता होता.

त्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही. कुंडलिकराव जगताप यांनी आपल्या स्नुषाचे कौतुक करताना, डॉ. प्रणोती यांना व्यवसायापेक्षा राजकारणात रस जास्त असल्याचे सांगून श्रीगोंद्याच्या राजकारणात नवीन चेहरा येण्याचे संकेत दिले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com