कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा १ मार्चला मालेगावात रोड शो

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झालेला असतानाही त्याच्या दुसऱ्याच दिवशी धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेतली होती. त्यावर कॉंग्रेस नेत्यांनी टिका केली. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांची धुळे येथील सभेच्या दिवशी ओझर विमानतळावरुन जाताना किंवा सभेनंतर परतीच्या प्रवासात मालेगाव शहरात त्यांचा रोडशो घेण्याचे नियोजन सुरु आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा १ मार्चला मालेगावात रोड शो

मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या १ मार्चला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी धुळे मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी मतदारसंघातील मालेगाव शहरात त्यांचा रोड शो होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासाठी नियोजन सुरु आहे अशी माहिती महापौर रशीद शेख यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. त्यादृष्टीने धुळे, नंदुरबार या एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या परिसरात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. या भागात इंदिरा गांधी विशेष लोकप्रिय होत्या. मतदारांवर त्यांच्या नावाची भुरळ अद्यापही कायम आहे. श्रीमती सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हा त्यांची पहिली जाहिर सभा याच भागात नंदुरबारला झाली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या प्रचारसभेला विशेष महत्व आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेसने अद्याप आपला उमेदवार निश्‍चित केलेला नाही.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झालेला असतानाही त्याच्या दुसऱ्याच दिवशी धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेतली होती. त्यावर कॉंग्रेस नेत्यांनी टिका केली. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांची धुळे येथील सभेच्या दिवशी ओझर विमानतळावरुन जाताना किंवा सभेनंतर परतीच्या प्रवासात मालेगाव शहरात त्यांचा रोडशो घेण्याचे नियोजन सुरु आहे. त्या दृष्टीने वरीष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती महापौर रशीद शेख यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com