Rahul Gandhi Tweets About Nitin Gadkary's Comment on Reservation | Sarkarnama

राहुल गांधी म्हणतात....गडकरीजी, एक्‍सलंट क्वश्‍चन! 

सुरेश भुसारी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विधानावर सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. "नोकऱ्याच नाही तर आरक्षणाचा लाभ कसा?'', असा सवाल गडकरींनी केला होता. यावरून गेल्या दोन दिवसांपासून नेटकऱ्यांनी हजारो ट्वीट केले आहेत.

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ट्विट युद्धात आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. राहुल गांधींनी आज केलेल्या ट्विटमध्ये 'एक्‍सलंट क्वश्‍चन, गडकरीजी' असे उपरोधिकपणे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विधानावर सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. "नोकऱ्याच नाही तर आरक्षणाचा लाभ कसा?'', असा सवाल गडकरींनी केला होता. यावरून गेल्या दोन दिवसांपासून नेटकऱ्यांनी हजारो ट्वीट केले आहेत. यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक रोजगार निर्माण झाल्याचा दावा केला आहे. यापार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'नोकऱ्याच नाही' असे म्हटल्याने काँग्रेससह विरोधी पक्षाच्या भात्यात टीका करण्यासाठी बाण मिळाले आहेत. 

या वादात आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी मारली आहे. नोकऱ्या कुठे आहेत? या गडकरींच्या वक्तव्यावर सोमवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्‌विट करून 'एक्‍सलंट क्वश्‍चन, गडकरीजी, प्रत्येक भारतीय हाच प्रश्‍न विचारत आहे', असे ट्‌विट केले आहे. 'व्हेअर आर दी जॉब' या हॅशटॅगवर दिलेल्या राहुल गांधी यांच्या या ट्विटला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काही तासातच राहुल गांधी याचे ट्वीट तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी रिट्‌विट केले तर 7 हजार लोकांनी लाईक केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख