rahul gandhi targetted trs | Sarkarnama

टीआरएस ही संघ आणि भाजपची बी टीम: राहुल 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

कोसगी : तेलंगणातील सत्तारुढ तेलंगण राष्ट्र समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची "बी' टिम आहे, अशी टीका आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

येथे बुधवारी आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी टीआरएस म्हणजे तेलंगण राष्ट्र समिती नाही तर तेलंगण राष्ट्रीय संघ परिवार आहे, अशा शब्दात टीका केली. 

तेलंगणात भाजप आणि टीआरएसला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने विरोधकांची आघाडी केली आहे. त्यात चंद्रबाबू नायडू यांची तेलगू देसम पक्ष, भाकप आणि तेलंगण जन समिती (तेजस) या पक्षांचा समावेश आहे. राज्यात भाजप आणि टीआरएस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. सभेत बोलताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि एमआयएम पक्ष यांची मिलिभगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार नाही, यासाठी टीआरएस आणि एमआयएम मोर्चेबांधणी करत असल्याचेही ते म्हणाले.  
 
संबंधित लेख