'खाऊ देणार नाही असे ' म्हणणारा चौकीदार कुठे आहे? -राहुल गांधी 

"आधी ललित, मग मल्ल्या, आता नीरवही झाला फरार, कुठे आहे ' न खाऊंगा न खाने दुंगा' सांगणारा देशाचा चौकीदार?'- राहुलगांधी
Rahul_Gandhi_and_Narendra_Modi
Rahul_Gandhi_and_Narendra_Modi

नवी दिल्ली  :  पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) साडेअकरा हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणावरून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले. 'न खाऊंगा न खाने दुंगा' असे सांगणारा चौकीदार कुठे आहे,' असा प्रश्‍न राहुल यांनी केला.

बॅंक गैरव्यवहार प्रकरणावरून कॉंग्रेसतर्फे सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल यांनी कॉंग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर सरकारवर शरसंधान करताना उच्चपदस्थांच्या पाठबळाशिवाय हा गैरव्यवहार होऊच शकत नाही, असा आरोप केला होता. आज पुन्हा एकदा त्यांनी ट्‌विट करून मोदींना लक्ष्य केले.

"आधी ललित, मग मल्ल्या, आता नीरवही झाला फरार, कुठे आहे "न खाऊंगा न खाने दुंगा' सांगणारा देशाचा चौकीदार?' असा प्रश्‍न राहुल यांनी केला. एवढेच नव्हे तर 'साहेबांच्या मौनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे. परंतु, त्यांचे मौन ओरडून सांगते आहे की त्यांनी निष्ठा कोणाशी आहे', असाही टोला त्यांनी लगावला.


कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनीही याच मुद्यावर सरकारला धारेवर धरताना 'नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांना परदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली?' असा प्रश्‍न केला आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com