Rahul Gandhi to take action against leaders in Nagpur Congress | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांवर कारवाई? राहुल गांधींनी दिले संकेत

सरकारनामा न्यूजब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर: गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादावादीत आता कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लक्ष घालणार असून यासाठी जबाबदार नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे समजते. यामुळे कॉंग्रेसमधील या नेत्यांनी दिल्ली गाठण्याची तयारी चालविली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून नागपूर शहरातील नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. नागपुरात कॉंग्रेसचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही.  ही वेळ कॉंग्रेसवर 1952 पासून पहिल्यांदाच आली आहे. एवढा दारूण पराभवानंतरही कॉंग्रेस नेत्यांमधील मतभेद मिटले नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातच कॉंग्रेस नेत्यांनी उघडपणे प्रचार केला. हा सर्व प्रकार पुराव्यासह राहुल गांधींकडे पाठविण्यात आला आहे.
नागपुरातील या नेत्यांच्या वर्तणुकीबद्दल राहुल गांधींनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. या नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी या नेत्यांना दिले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळे नागपुरातील असंतुष्ट नेत्यांची पाचावर धारण बसल्याचे समजते. त्यामुळे हे नेते दिल्ली गाठून आपबिती सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते. या असंतुष्ट नेत्यांना अद्यापही राहुल गांधींनी वेळ दिलेली नाही. 
 
संबंधित लेख