rahul gandhi said modi spent more money | Sarkarnama

मोदींच्या प्रचारासाठी पैसा कोठून येतो ? : राहुल गांधी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

आग्रा : टीव्हीवरील तीस सेकंदांच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये खर्च येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इतक्‍या जाहिरातींसाठी पैसा कोठून येतो, असा प्रश्‍न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला विचारला आहे. 

सिक्री येथील कॉंग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ""देशात प्रत्येक ठिकाणी मोदींचीच प्रसिद्धी केली जात आहे. यासाठी लागणारा पैसा कोठून येतो? टीव्हीवरील तीस सेकंदांची एक जाहिरात किंवा वृत्तपत्रांमधील जाहिरात यासाठी लाखो रुपये लागतात. हा पैसा मोदींच्या खिशातून निश्‍चितच येत नाही,'' असे राहुल म्हणाले. मोदींनी सामान्य जनतेचे पैसे लुटून ते नीरव मोदी, विजय मल्ल्या अशा फरार उद्योगपतींना दिले, असा दावाही राहुल यांनी केला.
 
पंतप्रधान मोदींनी खोटी आश्‍वासने दिल्याचा दावा करतानाच राहुल यांनी सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याच्या आश्‍वासनाचा पुनरुच्चार केला. या "न्याय' योजनेसाठी लागणारा पैसा मध्यमवर्गाकडून नव्हे, तर अनिल अंबानी, मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी अशांकडून वसूल केला जाणार असल्याचेही राहुल म्हणाले.  

संबंधित लेख