rahul gandhi respects hindu tradition : Chaturvedi | Sarkarnama

राहुल गांधींनी स्वतःचे गोत्र सांगून हिंदू परंपरांचा आदर केला : प्रियांका चतुर्वेदी

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपलं गोत्र आणि वर्ण सांगून तेथील परंपरांचा आदरच केला आहे. पण जे केवळ धर्माचे ठेकेदार म्हणून काम करतात त्यांना यात राजकारण दिसत आहे, अशी टीका काॅंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केली. सकाळ फेसबुक लाइव्हवर झालेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

पुणे : काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपलं गोत्र आणि वर्ण सांगून तेथील परंपरांचा आदरच केला आहे. पण जे केवळ धर्माचे ठेकेदार म्हणून काम करतात त्यांना यात राजकारण दिसत आहे, अशी टीका काॅंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केली. सकाळ फेसबुक लाइव्हवर झालेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

राहुल यांना स्वतःचे गोत्र आणि वर्ण मध्य प्रदेशमधील मंदिरात पूजा करताना सांगितले होते. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली. यावर बोलताना चतुर्वेदी यांनी सांगितले की त्यांनी तेथील परंपरांचा आदर केला आहे. कोणत्याही मंदिरात आपण गेल्यानंतर तेथे जी माहिती विचारली जाते, ती आपण देतो. हा तेथील परंपरांचा सन्मान करण्याचा विषय आहे. याचा अर्थ काॅंग्रेसने पुराणमतवादी भूमिका घेतली आहे, असा नाही.

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास काॅंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष विरोध करत आहेत.  भाजपचे हिंदूत्व आता काॅंग्रेसने घेतले आहे का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की काही विषय श्रद्धेचे असतात. सर्वोच्च न्यायालयाने तेथे महिलांसाठीची प्रवेशबंदी उठवली असली तरी समाज अजून ते मान्य करत नाही. त्यांचे मत विचारात घेऊनच अशा प्रश्नांतून मार्ग काढावा लागतो.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील निवडणुकांनतर काॅग्रेसयुक्त भारत होण्यास सुरवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत प्रत्येक राज्यात टिम बांधली आहे. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीत अाता नक्कीच सुधारणा होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

भाजपचे प्रवक्ते आणि तुमच्यात सारखी शाब्दिक चकमक टिव्हीवर चालते. भाजपच्या कोणता प्रवक्ता चांगली मते मांडतो, असे विचारले असता भाजपच्या प्रवक्त्यांत खोटे बोलण्यावरून स्पर्धा लागल्याचे दिसते. सरकारची कामगिरी मांडतात हे प्रवक्ते इतके खोटे बोलतात की त्यातील सत्य शोधून काढणे अवघड होऊन बसते.    

  

 

संबंधित लेख