rahul gandhi rally rajastan | Sarkarnama

 उद्योगपतींची कर्जे मोदींनी माफ केली : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

धौलपूर (राजस्थान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींची कर्जे माफ केल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केला. मोदी अंबानी चौकीदारी करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

निवडणूक प्रचार सभेत बोलताना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावरही राहुल यांनी टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, ""आम्ही दहा दिवसांत शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर मोदींनी गेल्या साडेचार वर्षांत देशातील सर्वांत श्रीमंत 15-20 उद्योगपतींची साडेतीन लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली. नरेंद्र मोदी हे मेहुल चोक्‍सीचा उल्लेख "भाऊ' असा करतात. रोजगारासाठी राजस्थानातील युवक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना लाठ्या खाव्या लागतात. या युवकांची मुख्यमंत्र्यांनी "लफंगे' अशा शब्दांत संभावना केली. राज्यातील महिलांच्या वेदना मुख्यमंत्र्यांना समजल्याच नाहीत.''

 नरेंद्र मोदी आणि वसुंधराराजे यांनी गेल्या साडेचार वर्षांत गरिबांसाठी, कामगारांसाठी काय केले, असा प्रश्‍न करून राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या कामांची यादी जाहीर केली. "मनरेगा', शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, विद्यार्थ्यांसाठी भोजनाची योजना आदींचा त्यांनी उल्लेख केला. 

संबंधित लेख