rahul gandhi rally in rajastan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

रखवालदारच चोर असल्याचे लोक म्हणताहेत : राहुल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

डुंगरपूर (राजस्थान) : राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दररोज टीका करण्याचा विडा उचललेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी "देशाचा रखवालदार चोर असल्याचे लोक म्हणत आहेत,' असा टोमणा मारला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांची आज संगवारा भागात सभा झाली. ""राफेल करार आणि विजय मल्ल्याने केलेला गैरव्यवहार या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधान मौन बाळगत आहेत. ते स्वत:ला देशाचे चौकीदार समजतात. पण, आता "गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है' असे सर्वत्र ऐकू येत आहे,'' असे राहुल येथील सभेत म्हणाले. राहुल यांच्या या विधानावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तातडीने टीका केली. कॉंग्रेसच्या अध्यक्षांना पंतप्रधानपदाबाबत कोणताही आदर नाही, असे इराणी म्हणाल्या. 
 
संबंधित लेख