is rahul gandhi hindu? bjp question | Sarkarnama

राहुल गांधी हिंदू आहेत का ? 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली ः अयोध्यात राम मंदिर उभारणीच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी कॉंग्रेस त्यांच्या नेत्यांचा वापर करीत असल्याचा टीका करीत त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावर भाजपने सोमवारी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

"कोणाच्या तरी प्रार्थनेचे स्थळ नष्ट करून तेथे राम मंदिर उभे राहावे, असे कोणत्याही सुजाण हिंदूंना वाटत नाही,' असे विधान कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी नुकतेच केले होते. यावर संतप्त झालेल्या भाजपने सोमवारी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव म्हणाले की, राम मंदिर प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकरच आदेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आमचा पक्ष आहे. मात्र यात विलंब करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. राम मंदिराचा प्रश्‍न लांबविण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी याचिका दाखल केली होती, असा आरोप राव यांनी केला. वादग्रस्त स्थळ नष्ट करण्याच्या अनेक वर्षांपूर्वीच्या घटनेशी राम मंदिर उभारणीचा संबंध विनाकारण जोडून या रांगेत आता थरूर यांची भर पडल्याचे ते म्हणाले. भव्य मंदिर उभारणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची भाजपला प्रतीक्षा आहे. याबाबत राहुल गांधी यांची त्यांची बाजू स्पष्ट करावी, असे आवाहन नरसिंह राव यांनी केले.

संबंधित लेख