rahul gandhi demonitition news | Sarkarnama

गरीबांच्या खिशातून पैसा काढून तो गर्भश्रीमंताना वाटला, राहुल गांधींची मोदींना टीका 

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : "" गरीबांच्या खिशातील पैसा काढून तो गर्भश्रीमंत उद्योगपतींना वाटला. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसलेला प्रयोग होता. मात्र नोटाबंदीची किंमत लोकांना मोजावी लागली अशी घणाघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. 

गांधी यांनी आज पत्रकार परिषद मोदी आणि त्यांच्या सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, की पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी देशातील जनतेला खूप मोठी स्वप्ने दाखविली. दोन कोटी रोजगार देण्याची भाषाही त्यांनीच केली होती. काळा पैसाही आणण्याचे आश्‍वासन त्यांनीच दिले होते. त्याचे काय झाले ? दिलेली आश्‍वासने मोदी यांनी पाळली नाहीत. उलट नोटाबंदीचा घेतलेल्या तडकाफडकीच्या निर्णयाचा फटका लोकांना बसला. नोटाबंदीचा फायदा गोरगरीबांना न होता तो श्रीमंताना झाला. नोटाबंदीचे काय झाले हे आता स्पष्ट झाले आहे. नोटाबंदी हाच एक मोठा घोटाळा आहे. नोटाबंदीचा देशातील पंधरा उद्योगपतींना फायदा झाला आहे.'' 

राफेल्स गैरव्यवहारावर राहुल म्हणाले, की राफेल ही क्‍लिअर कट आहे. काही दिवसापूर्वी स्थापन झालेल्या कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली आहेत. अनिल अंबानी यांनी कधी विमान बनविले नव्हते. उलट हिंदुस्थान ऍरोनेटिकला गेल्या साठ वर्षाचा अनुभव असताना दुसऱ्यांना कंत्राटे कशासाठी दिली ? 

संबंधित लेख