Rahul Gandhi congratulates Ashok Chavan | Sarkarnama

राहुल गांधींकडून अशोक चव्हाणांचे अभिनंदन!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई : नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने मिळविलेल्या अभुतपूर्व यशाबद्दल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व त्यांच्या सहका-यांचे ट्विट करुन अभिनंदन केले.

अर्थात राहुल यांनी हे ट्वीट आज (१३ आॅक्टोबर) सायंकाळी साडे चार वाजता केले.  अशोक चव्हाणांची कामगिरी राहुल यांच्याकडून बेदखल, असे वृत्त सरकारनामाने त्या आधी दिले होते. या वृत्तानंतर राहुल गांधी यांचे ट्विट आले.

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने एकूण 81 पैकी 73 जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विजयाचे मोठमोठे दावे करणा-या भाजपाला या निवडणुकीत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एमआयएम या पक्षांना खातेही उघडता आले नाही. या विराट विजयामुळे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नांदेडातून सुरु झालेला हा विजयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल आणि आगामी निवडणुकांतही कॉंग्रेस पक्ष विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

एका खासगी वाहिनीशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही अभिनंदनाचा दूरध्वनी आल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नांदेडमधील कामगिरीबद्दल अशोकरावांचे कौतुक केले. 

संबंधित लेख