Rahul Gandhi and Mawayati | Sarkarnama

मायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही  : राहुल

पीटीआय
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे. 

नवी दिल्ली   : मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या निर्णयाचा कॉंग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मायावती या लोकसभा निवडणुकीवेळी आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपविरोधात सर्व विरोधकांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरु असताना मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे. 

राहुल यांनी मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड येथे कॉंग्रेसच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त करत मायावती यांच्या या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसल्याचे आज येथील एका कार्यक्रमा दरम्यान सांगितले. 

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपविरोधात मायावती आघाडीत सहभागी होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. "राज्यात आघाडी असणे आणि केंद्रात असणे यात फरक आहे. आम्ही राज्यांच्याबाबत लवचिक धोरण ठेवले आहे. आघाडीबाबत आमची चर्चा सुरु होती, मात्र मायावतींनी त्यांच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे,' असे राहुल म्हणाले.
 

संबंधित लेख