राहुल द्विवेदी नगरचे नवीन जिल्हाधिकारी

नगर : नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबईतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवपदी बदल करण्यात आली असून, महाजन यांच्या जागी वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
collector-Dwivedi
collector-Dwivedi

नगर :  नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबईतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवपदी बदल करण्यात आली असून, महाजन यांच्या जागी वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

केडगाव मधील दुहेरी हत्याकांड, जिल्ह्यातील प्रशासकीय परिस्थिती व पालकमंत्री राम शिंदे यांची नाराजी यामुळे ही बदली झाल्याचे समजते.   

महाजन यांच्या कामावर पालकमंत्री राम शिंदे हे नाराज होते. शिवाय वाळू तस्करांवरील कारवाई न होणे, महसुली उद्दिष्टपूर्ती न होणे, प्रशासकीय कामातील जलदगतीचा अभाव आदी कारणांमुळे प्रशासकीय वर्तृळातही त्यांच्या विषयी नाराजी होती.

महाजन यांनी 2 मे 2017ला नगरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला होता. अवघ्या एका वर्षात त्यांची बदली करण्यात आली आहे. राहुल द्विवेदी पदभार घेईपर्यंत नाशिक येथील महसूल आयुक्‍त हे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान,  द्विवेदी हे 2009पासून भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांच्या रुपाने नगरला तरूण तडफदार जिल्हाधिकारी मिळाला आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द्विवेदी यांना जिल्ह्यात राजकीय नेतृत्त्वाला तोंड देण्याची वेळ येणार आहे.

मागील काही वर्षांपासून अशांत असलेल्या जिल्ह्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी द्विवेदी यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय  जिल्ह्याची ओळख राज्यात अति ताण असलेला जिल्हा अशी झाली आहे, हे आव्हान  द्विवेदी यांच्यासमोर राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com