भाजप महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे

भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांनी नेमणूक करण्यात आली. यापूर्वी चिकोडे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी विधानसभा निवडणूक आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लढली जाणार आहे. ही महत्त्वाची जबाबदारी चिकोडे यांच्यावर आली आहे.
भाजप महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांनी नेमणूक करण्यात आली. यापूर्वी चिकोडे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी विधानसभा निवडणूक आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लढली जाणार आहे. ही महत्त्वाची जबाबदारी चिकोडे यांच्यावर आली आहे.

चिकोडे यांनी 1997 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या कामाची दखल घेत त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी युवकांचे संघटन यशस्वीरीत्या केले. मंगळवार पेठ मंडलचे अध्यक्षपदी ही त्यांनी काम केले. विविध सामाजिक, विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी लोकांना सोबत घेऊन कार्य केले.

पक्षवाढीसह आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवून पक्ष लोकांपर्यत नेऊन केलेल्या कामामुळे वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक कऱण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीची त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष, संवेदना फौंडेशनचे व विद्या प्रबोधिनीचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या निवडीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांची शिफारस महत्त्वाची ठरली.

संघटनात्मक कामगिरी
चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांनी नवऊर्जा महोत्सव, विज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी एसडीएनएक्‍स (SDNX) इनोव्हेशन लॅब, आडवाटेवरचे कोल्हापूर असे विविध उपक्रम राबविले. नजीकच्या काळातच त्यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य व भारत स्काऊड गाईचे आयुक्त म्हणून एक वेगळी जबाबदारी पार पाडत आहेत. संघटनात्मक कामगिरी, पक्षाचा प्रसार आणि प्रसार, नेतृत्वगुणांमुळेच त्यांच्यावर पक्षाने आता प्रभारी जिल्हाध्यक्ष ही मोठी जबाबदारी दिली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com