rahul aher appeal farmer not drink poision | Sarkarnama

आमदार राहूल आहेर शेतकऱ्याला म्हणाले, ""चल, विषाची बाटली आण, आपण दोघेही आत्महत्या करु'' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जानेवारी 2019

नाशिक : ""तुमच्यावर दोन-तीन लाखांचे कर्ज आहे. माझ्या डोक्‍यावर तर सात कोटींचे कर्ज आहे. आत्महत्या हा काही त्यावर उपाय नाही. त्याने प्रश्‍न सुटणार असेल तर विषाची बाटली आण. अर्धी तु घे, अर्धी मी घेतो.' असे सांगत आमदार आहेर यांनी भावनीक झालेल्या शेतकऱ्याची समजुत घेतली. 

आर्थीक संकटात असलेला विठेवाडी (नाशिक) येथील वसंतदादा साखर कारखाना आमदार आहेर यांनी विविध स्तरावर प्रयत्न करुन सुरु केला. या कारखान्याकडे गेल्या दोन वर्षापासून ऊसउत्पादकांचे सहा कोटी रुपये येणे आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

यावेळी ऊसाचे पैसे लवकर मिळावेत असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. यावेळी निफाडचे बाळासाहेब डेर्ले यांनी अतिशय भावनीक होऊन आपली व्यथा मांडली. "शेतकऱ्यांवर कर्ज झाले आहे. त्यांनी ते कसे फेडायचे. या कर्जामुळे आत्महत्या करायची वेळ आली आहे' असे सांगितले. त्याला या विचारापासून परावृत्त करण्यासाठी आमदार आहेर यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत समजुत घातली. "तुझ्यावर दोन- तीन लाख कर्ज आहे. माझ्यावर सात कोटी आहे. आत्महत्या हा काही कर्जावर पर्याय नाही' असे सांगीतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी, शेतकरीही उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख