raghunathdada about avani and maneka gandhi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शेतकऱ्यांच्या बाजूने असाल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाका!

संपत मोरे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

उंदराचे ही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजप वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत.

पुणे: ''भाजप सरकार जर शेतकऱ्यांच्या बाजूंचे असेल तर त्यांनी वाघाची बाजू घेणाऱ्या मनेका गांधी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. मनेका गांधीनी वाघाची बाजू घ्यायची आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं हा काय प्रकार आहे? तुमच्यात तरी मेळ आहे का?"असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ते म्हणाले,"भाजपमध्ये कसलाही मेळ राहिलेला नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना त्यांनी प्राणीमित्रांच्या बाजूने बोलायला लावले आहे आणि इथले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. म्हणजे उंदराचे ही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजप वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत. त्यांना जर खरोखर शेतकऱ्यांची बाजू घ्यायची असेल तर त्यानी गांधी यांना आजच्या आज मंत्रिमंडळातून काढून टाकावे. सुधीर मुनगंटीवार हे जरी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत असले तरी १३ लोक मारेपर्यंत ते गप्प का बसले होते, पहिला माणूस मारला तेव्हाच वाघ कां मारला नाही?"असाही सवाल पाटील यांनी केला.
 

संबंधित लेख