raghunath patil shetkari sanghatana | Sarkarnama

भाजप सरकार अदानी-अंबानी साठी काम करते : रघुनाथदादा पाटील

सुचिता रहाटे
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई : कॉंग्रेस सरकार हे टाटा-बिर्ला साठी काम करायचे, तर आताचे भाजप सरकार हे अदानी-अंबानी यांच्यासाठी काम करत आहे. त्यावेळचे सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी नव्हते. आताचे भाजप सरकार देखील शेतकरी विरोधी आहेत, असा आरोप शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. मुंबईत पार पडलेल्या जनफोरम परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी परिस्थिती होती. पण आताची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून उत्तम नोकरी, उच्च व्यापार आणि कनिष्ठ शेती असे त्याचे स्वरूप झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून शेतीचे उत्पादन वाढवून घेतले परंतु म्हणावे तसे शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळाले नाही. शेतकऱ्यांशी वाद घालाल तर ते अजून आक्रमक होतील, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी सरकारला दिला. 

देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजवर तीन लाख शेतकऱ्यांचे बळी गेले. या बळींना सत्ताधारीच जबाबदार आहेत. ब्रिटिश-मुघलांनी जेवढे बळी घेतले नाहीत तेवढे शेतकऱ्यांचे बळी सत्ताधाऱ्यांनी घेतले, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत सल्लामसलत केली. त्यापेक्षा शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर त्यातुन चांगलेच निष्पन्न झाले असते. 
 
संबंधित लेख