raghunath patil press in kolhapur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

चंद्रकांतदादांच्या घरावर 3 नोव्हेंबरला मोर्चा

​सदानंद पाटील
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : गत हंगामातील एफआरपी अधिक 200 रुपयांचा हिशेब मागण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. 

हा मोर्चा 3 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथे 13 शेतकरी संघटनांची बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बी. जी. पाटील, शिवाजी माने, पंजाबराव पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गत हंगाम सुरू करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली होती. यावेळी एफआरपी अधिक 200 रुपयांचा तोडगा निघाला होता. यात पालकमंत्री पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. आता दुसरा हंगाम सुरू झाला असून मागील हंगामातील दोनशे रुपयांची रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम मिळवून देण्याची जबाबदारी देखील पालकमंत्री पाटील यांचीच आहे. त्यामुळे त्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या सरकारने नियमन मुक्तीचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल पालकमंत्री पाटील यांचे अभिनंदन देखील करणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख