raghunath patil about loksabha election | Sarkarnama

मी मोदींविरोधात लढावं असं लोकांना वाटतं...

संपत मोरे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

भाजपसोबत युती करण्याची नेमकी आयडिया कोणाची? राजू शेट्टींची की सदाभाऊंची?

पुणे: "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, असा शेतकरी सुकाणू समितीचा आग्रह आहे पण मी मात्र 'हातकणंगले'मधूनच लढणार आहे. निवडणूक कोठूनही लढवली तरी काही फरक पडत नाही, मात्र निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे,'' असे मत संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.

पाटील म्हणाले,"खासदार राजू शेट्टी यांनी पुरोगामी विचारांच्या पक्षाशी युती करायचं ठरवलं आहे? हे पुरोगामी पक्ष म्हणजे नेमके कोणते? साखर कारखानदार राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार पुरोगामी पक्षात आहेत मग या पुरोगाम्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर राजू शेट्टी यांना चालतं काय? असा सवाल त्यानी उपस्थित केला.

"शेतकरी नेते म्हणवून घेणारे सत्तेत गेले आणि त्यांच्या दुटप्पीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या? भाजपसोबत युती करण्याची नेमकी आयडिया कोणाची? राजू शेट्टींची की सदाभाऊंची? मग आता एकमेकांवर टिका का करता? या टिकेतून शेतकऱ्यांचे नेमके कोणते प्रश्न मार्गी लागतात? शेतकरी आशेने तुमच्याकडे बघतात. त्यांना कोणाचाही आधार वाटत नाही. मी माझ्या पध्दतीने काम करतोय पण मला मर्यादा आहेत. आज शेतकरी संघटनेचे म्हणवून घेणारे सगळे नेते सत्तेत आहेत तरीही शेतकरी आत्महत्या करतोय? हा या नेत्यांचा पराभव आहे'', असे पाटील म्हणाले.

संबंधित लेख