raffel agreement contry loss 41 thousand crore | Sarkarnama

राफेलमुळे देशाचे 41 हजार कोटींचे नुकसान 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

बंगळूर : फ्रान्सच्या कंपनीकडून 108 "राफेल' लढाऊ विमाने खरेदीसाठी मोदी सरकारने केलेल्या नवीन करारामुळे देशाला 41 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केली. 

बंगळूर : फ्रान्सच्या कंपनीकडून 108 "राफेल' लढाऊ विमाने खरेदीसाठी मोदी सरकारने केलेल्या नवीन करारामुळे देशाला 41 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केली. 

पत्रकार परिषदेत आज बोलताना ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अनिल अंबानी यांना मदत करण्याच्या उद्देशानेच हा व्यवहार झाला आहे. कारण करारापूर्वी केवळ 12 दिवस आधी अंबानी यांनी नवीन कंपनीची स्थापना केली होती. राफेल करार अधिक पारदर्शी असून, त्याची किंमतही कमी असल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा दावा हा सत्यापासून दूर असल्याची टीका करीत रेड्‌डी यांनी या व्यवहराची माहिती खुली करण्याची मागणी केली.

 राफेल कराराची चौकशी झाल्यास सत्य परिस्थिती बाहेर येईल या भीतीने संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) नियुक्ती करण्यास सरकार इच्छुक नाही, असेही ते म्हणाले. 
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या करारासंदर्भात उपस्थित केलेल्या 10 प्रश्‍नांची उत्तरे मोदी यांनी अद्याप दिलेली नाहीत. देश व घटना यांच्यापेक्षा मोठे असल्याचा समज मोदी यांचा आहे. या करारात मोदी हे फ्रान्सची कंपनी व अद्योजक अनिल अंबानी यांच्यातील मध्यस्त आहे, असा आरोप रेड्डी यांनी केला. 

पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली पाहिजे. 
जयपाल रेड्डी, माजी केंद्रीय मंत्री 

संबंधित लेख