Radheshyam Mopalwar Removed | Sarkarnama

अखेर वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवारांना पदावरून हटवले

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

राधेश्याम मोपलवार हे एमएसआरडीसीचे संचालक आहेत. त्यांच्या एका आॅडिओ क्लीपचा संदर्भ देत विरोधकांनी राधेश्याम मोपलवार यांचा राजिनामा घ्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी दोन दिवसापासून लावून धरली आहे.

मुंबई : 'मी कालच सांगितले आहे. एक महिन्याच्या आत फाॅरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु विरोधी बाकावर वरून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जातआहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होई पर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल,' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. यावेळी तुमच्या काळातील कामाचे हे भ्रष्टाचाराचे आरोप आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला.

राधेश्याम मोपलवार हे एमएसआरडीसीचे संचालक आहेत. त्यांच्या एका आॅडिओ क्लीपचा संदर्भ देत विरोधकांनी राधेश्याम मोपलवार यांचा राजिनामा घ्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी दोन दिवसापासून लावून धरली आहे. विरोधकांनी मोपलवारांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विधानसभेत गोंधळ घातला होता. विरोधक गोंधळ करत वेलमध्ये उतरले होते. मोपलवारांचा फोटो असलेल्या फलकावर 'काय वाट्टेल ते करा सरकार माझे काहीही माझे काहीही बिघडवू शकत नाही' असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊऩ विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब करावी लागली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत येत निवेदन सादर केले.

 

संबंधित लेख