radhakryshana vikhe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मध्यावधी निवडणुकीस आम्हीही तयार : विखे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जून 2017

नगर : ""राज्यातील मध्यावधी निवडणुकीचा विषय मूळ विषयाला बगल देण्यासाठी आहे. तथापी, सरकार मध्यावधी निवडणूक घेत असेल, तर आम्ही तयार आहोत,'' असा सूचक इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. 

नगर : ""राज्यातील मध्यावधी निवडणुकीचा विषय मूळ विषयाला बगल देण्यासाठी आहे. तथापी, सरकार मध्यावधी निवडणूक घेत असेल, तर आम्ही तयार आहोत,'' असा सूचक इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. 
नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार आहेत. मात्र, ते बॅंकेच्या नियमात बसते का? रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डने हा निर्णय घेतला असता, तर तो मान्य होता. सरकार कसे काय शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देऊ शकते? शिवसेनेच्या मागण्यांना सरकारने वाटण्याचा अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हसू झाले. कर्जमाफीमध्ये तत्त्व:त, अंशत: असे शब्द घातल्याने घोळ झाला आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा आणि शेतमालाला 50 टक्के नफा मिळेल असे धोरण करावे, अशी मागणी करीत आम्ही संघर्ष यात्रा काढली. शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची मानसिकता संघर्ष यात्रेतून झाली. त्यामुळे शेतकरी संघटनेने श्रेय घेण्याचा विषय येत नाही.'' 
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल साठविण्यासाठी आज कोणतीही व्यवस्था नाही. ती करणे काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. तुरीच्या हमीभावाची रक्कम बोनस म्हणून शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी होती. मध्यंतरी सरकारने तूरखरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर दिली. त्यानंतर पुन्हा तूरखरेदी केंद्रांवर घोटाळा झाला. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या चौकशीचा फार्स करू नये, असेही विखे म्हणाले. 

संबंधित लेख