radhakrushna vikhe patil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

शेतकरी सुखी करा; सरकारचा डीजे लावून सत्कार करतो; विखे पाटील गरजले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई :  शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा डीजे लावून सत्कार करेल, अशी उपहासात्मक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

विधानसभेमध्ये नियम 293 अंतर्गत दुष्काळी उपाययोजनांसंदर्भातील चर्चेमध्ये ते बोलत होते. विखे पाटील यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर कडाडून टीका केली.

राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे भान नसलेले बेभान सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

सरकारने जाहीर केलेला दुष्काळ पुरेसा नाही. केंद्र सरकारच्या कठोर निकषांमुळे अनेक दुष्काळी तालुके या यादीतून वगळले गेले. सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 

शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणतीही थेट भरीव मदत जाहीर केली नाही, असे सांगून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रूपये मदत, फळबागा, डाळिंब, द्राक्ष, ऊसाला 1 लाख रूपये हेक्‍टरी मदत, खरीप 2018 पर्यंतचे सर्व शेतीकर्ज माफ करणे आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. 

जलयुक्त शिवारमध्ये राज्यात 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून, इतर 9 हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात शिर्डीत जाहीर केले होते. तरीही त्याच गावांमध्ये दुष्काळ का पडला, असा प्रश्न करून पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त जाहीर केलेली एकूण महाराष्ट्रातील 25 हजार गावांची यादी जाहीर करावी, असे आव्हान  विखे पाटील यांनी सरकारला दिले. 
 
संबंधित लेख