radhakrishna vikhe patil questions fadavnis govt | Sarkarnama

मग मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाच्या शिफारसी कां वाचून दाखवल्या नाहीत? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा जोरदारपणे हल्लाबोल केला.

पुणे: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदारपणे लावून धरली आहे. 

अहवाल पटलावर ठेवण्यावरुन विरोधी पक्षांत मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. या अहवालाविरुद्ध काहीजण लगेच न्यायालयात जाणार आहेत, त्याचा विचार करावा, तसेच घटनात्मक अडचण निर्माण होत असेल तर अहवाल पटलावर ठेवू नये, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. या भूमिकेला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला. 

भाजप आपणाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा जोरदारपणे हल्लाबोल केला. अहवाल गोपनीय ठेवायचा होता तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या शिफारशी कां वाचून दाखवल्या? मुख्य शिफारसी वाचून दाखवल्यात मग अहवाल पटलावर ठेवायला काय अडचण आहे? महिन्यापुर्वी धनगर आरक्षणासंबंधीचा अहवाल आला आहे, मग त्यातील शिफारसी कां वाचून दाखवण्यात आल्या नाहीत, असा सवालही विखे पाटील यांनी केला. 

 

संबंधित लेख