radhakrishna vikhe patil criticise chandrakant patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राम कदमांची पाठराखण करणाऱ्या चंद्रकांतदादांना सत्तेची धुंदी! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमदार राम कदम यांची पाठराखण करतो. सत्तेच्या धुंदीत असल्यानेच भाजप नेते अशी वक्तव्य करीत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

नगर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमदार राम कदम यांची पाठराखण करतो. सत्तेच्या धुंदीत असल्यानेच भाजप नेते अशी वक्तव्य करीत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

नगरमध्ये आयोजित कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, तरुण वर्ग नोकरीसाठी वणवण फिरत असताना सरकार काहीच करीत नाही. नोटाबंदीने तर देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्तच केली आहे. काळा पैसा आणण्याची घोषणा फसवी ठरली. त्यानिमित्ताने सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आगामी काळात जनता त्यांना धडा शिकविणार आहे. 

संबंधित लेख